'त्यांच्या' नाराजीचा पक्षश्रेष्ठी विचार करतील; रावसाहेब दानवेंचे नाशकात विधान

'त्यांच्या' नाराजीचा पक्षश्रेष्ठी विचार करतील; रावसाहेब दानवेंचे नाशकात विधान

नाशिक | Nashik

आपल्या देशाला स्वातंत्र्य (Freedom) मिळून ७५ वर्ष झाले आहेत. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हे वर्ष 'आझादी का अमृत महोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. या अमृत महोत्सवाची सुरुवात १२ मार्च २०२१ ला साबरमती (Sabarmati) पासून झाली. त्यानंतर याचा समारोप १५ ऑगस्ट २०२३ ला होणार असून या निमित्ताने देशभर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलतांना दिली...

'त्यांच्या' नाराजीचा पक्षश्रेष्ठी विचार करतील; रावसाहेब दानवेंचे नाशकात विधान
पोरं पावसात अन् नेते छत्रीत...; नाशिकच्या राष्ट्रगायन कार्यक्रमाचे फोटो व्हायरल

यावेळी दानवे म्हणाले की, 'हर घर तिरंगा' १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत शासनाच्या वतीने तसेच प्रत्येकाच्या वतीने आपल्या घरावर लावावा अशा प्रकारची अपेक्षा देशाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली असून याला देश पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.

या कार्यक्रमाचे निमित्ताने देशाचे जेवढे केंद्रीय मंत्री आहेत त्या सर्व केंद्रीय मंत्र्यांना ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, त्याग केला, बलिदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाजवळ जायचे त्यांच्या कुटुंबियांना भेटायचे त्यांचा सन्मान करायचा अशा प्रकारचा कार्यक्रम केंद्रीय मंत्र्यांना दिला असून त्याच कार्यक्रमाच्या अंतर्गत आज नाशिकला येऊन विनायक दामोदर सावरकरांच्या (Vinayak Damodar Savarkar) भगूर (bhagur) येथील जन्मस्थळी जाऊन नाशिकसह जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या परिजनांना भेटून त्यांचा सन्मान केला, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, दीडशे वर्ष आपण गुलामीमध्ये राहिलो, आपल्याला स्वातंत्र्य होऊन जवळपास ७५ वर्ष पूर्ण होत आहे. परंतु आपण जर मागे वळून पाहिले तर देशाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला परंतु त्यांचे नाव अद्यापही लोकांना माहिती नाही अशा स्वातंत्र्य सैनिकांचे संकलन करून देशभर १२ मार्च २०२१ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत त्यांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांचे नाव जनतेसमोर ठेऊन इतिहास लोकांना माहिती व्हावा, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असेही दानवे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पुढील २५ वर्ष आपल्या देशासाठी महत्वाचे असून मोदी सरकारच्या (Modi Government) आठ वर्षाच्या काळात देशाचा पुढील भविष्याचा विचार करण्यात आला आहे. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात (budget) नुसता एका वर्षाचा विचार करण्यात आला नसून पुढील २५ वर्षात आम्ही देशाला कुठपर्यंत घेऊन जावू याचा विचार करण्यात आल्याचेही दानवे यांनी सांगितले.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्य मंत्री मंडळवर व्यक्त केलेल्या नाराजीचा पक्षश्रेष्ठी निश्चीत विचार करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com