रानवड साखर कारखाना उपपदार्थ बनवणार

रानवड साखर कारखाना उपपदार्थ बनवणार

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

रानवड साखर कारखाना ( Ranwad Sugar Factory )भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेणार्‍या पिंपळगाव बसवंत येथील स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेच्या संचालक मंडळाने कर्जत येथील श्री अंबालिक व पुण्याच्या दौंड शुगर प्रा. लि. साखर कारखान्यास भेट देत तेथील ऊस गाळपाबरोबरच फळबाग प्रकल्प, शेततळी, डिस्लरी, इथेनॉल प्रकल्प आदींची पाहणी करून रासाका येथेदेखील उपपदार्थ ( by-products )बनविण्याचा मनोदय आ. दिलीप बनकर (MLA. Dilip Bankar )यांनी व्यक्त केला.

यावेळी या शिष्टमंडळाने अंबालिका व दौंड साखर कारखान्याची कार्यपद्धती व उपउत्पादने रासाकात आणण्याचा संकल्प केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. बनकर यांच्या नेतृत्वाखालील पाहणीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाला मार्गदर्शन केले. दोन्ही कारखान्यांचे कामकाज पाहून आ. बनकर यांच्यासह शिष्टमंडळाने रासाकात यातील काही संकल्पना राबवण्याची खूणगाठ बांधली. सहकारातून समृद्धी या ब्रीदवाक्याप्रमाणे साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेणारी पिंपळगाव बसवंत येथील स्व. अशोकराव बनकर पतसंस्था देशातील पहिली सहकारी संस्था ठरली.

येत्या हंगामात रासाका सुरू करण्यासाठी देखभाल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रासाकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आ. बनकर यांनी निश्चय केला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेच्या संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व असलेल्या अंबालिका व दौंड शुगर प्रा. लि. साखर कारखान्याच्या कामकाजाचा अभ्यास दौरा केला.250 एकरमध्ये विस्तार असलेल्या या कारखान्यात 600 कामगारांच्या सहाय्याने 10 हजार टनाचे दररोजचे ऊस गाळप, फळबाग प्रकल्प, शेततळी, डिस्लरी, इथेनॉल प्रकल्प आदींची शिष्टमंडळाने माहिती घेतली.

रासाकाला ऊर्जितावस्था देण्यासाठी आ. बनकर यांनी निश्चय केला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेच्या संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व असलेल्या अंबालिका व दौंड शुगर प्रा.लि. साखर कारखान्याच्या कामकाजाचा अभ्यास दौरा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रासाकाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी मार्गदर्शन केले.

यावेळी आ. दिलीप बनकर, स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळोदे, बाळासाहेब बनकर, चंद्रकांत राका, उमेश जैन, बाळासाहेब भुतडा, रवींद्र आवारे, अविनाश बनकर, प्रमोद कुटे, अरुण घोटेकर, पुंडलिक घोलप उपस्थित होते. दरम्यान, ऊस गाळपाबरोबरच रासाका परिसरात इतर बायप्रॉडक्ट सुरू करण्याचा मानस आ. बनकरांनी व्यक्त केल्याने परिसरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच रासाका परिसरातील गावांच्या विकासालादेखील हातभार लागणार आहे. तसेच अनेक तरुण या परिसरात छोटे-मोठे व्यवसायदेखील करणार असल्याने बनकरांच्या या निर्णयाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com