त्रिकुटावर खंडणीचा गुन्हा

त्रिकुटावर खंडणीचा गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलीकडे पाहुन हसतो अशी कुरापत काढून सराईतासह त्रिकुटाने अल्पवयीन युवकास बेदम मारहाण केल्याचा प्रकार संत कबीरनगर (Sant Kabirnagar) परिसरात घडला...

ज्ञानेश्वर अर्जुन शिंदे (26) (Dnyaneshwar Arjun Shinde) अक्षय जगन गायकवाड (24) (Akshay Jagan Gaikwad) व अनिल जगन गायकवाड (Anil Jagan Gaikwad) (21, रा. सर्व समाज मंदिरमागे, संत कबीर नगर) अशी संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी ज्ञानेश्वर संजय डोंगरे (Dnyaneshwar Sanjay Dongre) (रा. संत कबिरनगर) याने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रात्रीच्या वेळी संशयितांनी डोंगरे यास आडवून दारूसाठी पैशांची मागणी केली. त्याने नकार देताच मुलीकडे पाहुन हसतो अशी कुरापत काढून बेदम मारहाण केली.

तसेच डोंगरे पळून त्याच्या घरी गेला असता घरात घुसून गॅलरीतून त्याला खाली पाडले. यामध्ये डोंगरे यांच्या दोन्ही पायांना फॅक्चर झाले आहे.

या प्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) संशयितांविरोधात खंडणी (Ransom), जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास सहायक निरिक्षक बैसाणे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com