...अन् जिल्हा परिषदेच्या सीईओंनी स्वतः बनवली रानभाजी

...अन् जिल्हा परिषदेच्या सीईओंनी स्वतः बनवली रानभाजी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक पंचायत समिती (Nashik Panchayat Samiti) आवारात शुक्रवारी आठवडी रानभाज्या महोत्सवाचे (Ranbhajya Mahotsav) आयोजन करण्यात आले होते...

या रानभाज्या महोत्सवात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांनी स्वतः बचत गटाच्या महिलांसोबत आंबाडीची रानभाजी बनवली.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वैयक्तिक परसबागेत आदिवासी भागात आढळणाऱ्या आंबाडीची भाजीची रोपं ही लावण्यात आलेली आहेत. यातूनच काही रोपं त्यांनी ही भाजी बनवण्यासाठी आणण्यात आली होती.

रानभाज्या महोत्सवात (Ranbhajya Mahotsav) रानभाज्या विक्रीसह बचत गटाच्या महिलांकडून भाज्या बनवल्या देखील जातात, आंबाडीची भाजी बनवून मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांनी या बचत गटांच्या स्टॉल्सना त्याचबरोबर उपस्थित ज्येष्ठ नागरिक, महिला व जिल्हा परिषदेचे अधिकारी देण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांनी थेट बचत गटाच्या स्टॉलवर जाऊन भाज्या (Vegetables) बनवल्यामुळे रानभाजी महोत्सवात हा कुतूहलाचा विषय ठरला.

महिला बचत गटांना भाज्या व वस्तूंची विक्री करताना ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढील काळात बचत गटांच्या महिलांची कार्यशाळा घेण्याच्या सूचना केल्या.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी दीपक चाटे, गट विकास अधिकारी डॉ. सारिका बारी, सहायक गट विकास अधिकारी विनोद मेढे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com