ग्रामीण भागात रणरागिणी आक्रमक

अवैध दारु अड्डे उद्ध्वस्त करण्याची मागणी
ग्रामीण भागात रणरागिणी आक्रमक

कळवण । प्रतिनिधी Kalwan

करोनाचे (corona) जागतिक संकट आले आणि कमी झाले. या काळात सर्वच उद्योग धंदे बंद होते. व्यापारही बंद होता परिणामी दारू दुकाने (Liquor stores) बंद होते. तेव्हा तळीरामांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात (rural areas) वळवत देशी विदेशी तहान गावठी दारूने भागविली. त्यामुळे ग्रामीण भागात गावठी दारूने तेव्हा जे डोके वर काढले ते आजपर्यंत तसेच आहे.

या गावठी दारूमुळे अनेक आदिवासीचे संसार उघड्यावर पडले आहे. तालुक्यातील अभोणा (Aabhona) व कळवण (Kalwan) पोलीस ठाण्यातअंतर्गत (police station) येणार्‍या सर्व गावठी हातभट्या उद्धवस्त कराव्यात अशी मागणी आदिवासी महिला करीत आहे. कळवण तालुक्यातील अभोणा व कळवण पोलीस ठाणे हद्दीत येणार्‍या नांदुरी, ओतूर, पाळेखुर्द, जयदर, मळगाव, देसराणे, रवळजी, मोकभणगी, मोहबारी, बंधारपाडा, दळवट, सुफले, सुळे, वीरशेत यासह असंख्य पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे गावात राजरोसपणे सर्रास गावठी निर्मिती व विक्री सुरु सल्याची आदिवासी भागात चर्चा आहे.

तालुक्यात करोनाच्या जागतिक महामारीचे निमित्तच झाले आणि गावठी दारूने डोके वर काढले. आता करोनाचे संकट टळले जणी नसले तरी कमी झाले आहे. शासनाला महसूल मिळावा म्हणून शासनाने काही काळ पोलीस बंदोबस्तात दारू दुकाने सुरु केली होती.

आतातर करोनाचे नियम शिथिल झाल्याने (relaxation of Corona's rules) तालुक्यातील देशी विदेशी दारू विक्रीची दुकाने सुरु झाली आहेत. असे असताना ग्रामीण भागात गावठी दारू विक्री जी करोना काळात सुरु झाली ती अजत्यागत सुरुच आहे. तालुक्यातील वाड्या वस्तीत व आसपासच्या जंगलामध्ये गावठी दारू गाळली जाते.

त्यामुळे ग्रामीण भागात अवैध गावठी दारूवाले जास्त फोफावल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील गावठी दारू उत्पादनासाठी जंगलांचा वापर केला जात आहे. गावठी दारू अतिशय घातक असून दारू तयार करण्यासाठी सुरवातीला काळा गूळ व नवसागर या सारख्या घटकांचा वापर केला जात होता. मात्र सध्या दारू तयार करण्यासाठी घातक रसायने (Hazardous chemicals), रंगाचे डबे (Color boxes), बॅटरीचे सेल (Battery cell) याचाही वापर होत आहे.

त्यामुळे हि दारू मानवी शरीरासाठी (human body) अत्यंत घातक आहे. गावठी दारू तयार केल्यानंतर सांडपाणी (Sewage) जंगलातच सोडून दिले जात आहे. ज्यामुळे जंगलातील पाणवठे प्रदूषित होऊन वन्यजीवांसाठी धोकादायक (Dangerous to wildlife) बनत आहे. त्याचबरोबर भट्टी लावण्यासाठी जंगलातीलच लाकडाचा वापर होत असल्याने वनसंपदा (Forest resources) अडचणीत सापडली आहे. त्यामुळे वनविभागानेही आता अवैध दारू (Illegal alcohol) करणार्‍यांविरोधात पुढे येणे गरजेचे आहे.

त्यामुळे तालुक्यातील आदिवासी महिलांचे संसार वाचविण्यासाठी वनविभाग व पोलीस प्रशासन (Forest Department and Police Administration) यांनी संयुक्तिक कारवाई करून अवैध गावठी दारू (Illegal village liquor) तयार किनार्‍याच्या वेळीच मुसक्या आवळाव्यात अशी मागणी आदिवासी महिलांनी केली आहे. खेडोपाडी किराणा दुकानात मुबलक प्रमाणात अवैध देशी विदेशी दारू (Illegal foreign liquor) विक्री सुरु आहे.

रसायन मिश्रीत ताडी विक्री - कळवण व अभोणा येथे सरकारमान्य परवाना धारक बतावणी केल्या जात असलेल्या ताडी विक्री दुकानातून शेकडो लिटर रसायनमिश्रित ताडीची सर्रास विक्री सुरु आहे. मजूर व नागरिकांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ राज्यउत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस प्रशासन डोळेझाक करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com