रमाबाई आंबेडकर वसतिगृहाने दिला अनेक विद्यार्थिनींना आधार : डॉ. गुंडे

रमाबाई आंबेडकर वसतिगृहाने दिला अनेक विद्यार्थिनींना आधार : डॉ. गुंडे

पंचवटी | प्रतिनिधी | Panchavati

नेहरू गार्डन समोरील नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थिनी वसतिगृहास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी सदिच्छा भेट दिली...

यावेळी वसतिगृहाचे सचिव पी. के. गायकवाड आणि आधिक्षिका बेबी डेरले यांनी डॉ. अर्जुन गुंडे व योगेश पाटील यांचे स्वागत केले. नाशिक जिल्ह्यातील परिस्थितीने नाजूक असलेल्या परंतु हुशार, होतकरू विद्यार्थिनींना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे व उत्तम पद्धतीने कामकाज चालू असलेले विद्यार्थिनी वसतिगृह असल्याचे प्रतिपादन व कौतुक नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे यांनी केले.

रमाबाई आंबेडकर वसतिगृहाने दिला अनेक विद्यार्थिनींना आधार : डॉ. गुंडे
नाशकात पुन्हा एकदा बसचा विचित्र अपघात

वसतीगृहाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करीत पुढील कामकाजासाठी शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी डॉ. अर्जुन गुंडे व योगेश पाटील यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सुजाता भालेराव, सुरेखा पवार ,रंजना देवरे, वैशाली नाठे उपस्थित होते. अधिक्षक बेबी डेरले यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com