करोना योद्धांना राखी बांधत केले रक्षाबंधन
नाशिक

करोना योद्धांना राखी बांधत केले रक्षाबंधन

सभापती अश्विनी आहेर यांचा उपक्रम

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी

रक्षाबंधन निमित्ताने करोना योद्धांना महाराष्ट्र युवक काँग्रेस सरचिटणीस व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती आर्की.अश्विनी आहेर यांनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

जगावर आणि आपल्या देशावर आलेल्या करोनासारख्या जीवघेण्या संकटामध्ये आपले कर्तव्य अगदी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणारे पोलीस, डॉक्टर, स्वच्छता दूत,आशा वर्कर, अंगणवाडी महिला व सामाजिक कार्यकर्ते यांनीच खऱ्या अर्थाने लोकांचे व पर्यायाने समाजाचे खरे रक्षण केलेले आहे.

अशा करोना योद्धांबद्दल 'कृतज्ञता भावाने' व आदराने यंदाचा "रक्षाबंधनाचा पवित्र" सण युवती काँग्रेसच्यावतीने नांदगाव तालुक्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्यान समिती सभापती अश्विनी अनिलकुमार आहेर यांनी साजरा करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com