वाहन चालकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

वाहन चालकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

अंबड औदयोगिक वसाहतीतील ( Ambad MIDC )गजानन ट्रान्सपोर्ट कंपनीतर्फे परराज्यातून आलेल्या वाहन चालकांना राखी बांधून रक्षाबंधन दिन ( Rakshabandhan) साजरा करण्यात आला.

नाशिक शहरात मालवाहू ट्रक घेऊन परराज्यातून दररोजच वाहन चालक येत असतात. नाशकात त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. व नेहमीच नाशिक ट्रान्सपोर्ट असोशिएशन ( Nashik Transport Association )तर्फे त्यांना सहकार्य केले जाते. यामुळे नाशिक ट्रान्सपोर्ट असोशिएशन व वाहन चालकांमध्ये भावंडांसारखे नाते निर्माण झाल्याने रक्षाबंधन दिनानिमित्त या बांधवांना राखी बांधून हा उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी गजानन ट्रान्सपोर्टचे संचालक अमोल शेळके,यांच्यासह मनी कंटा, प्रमोद यल्लाप्पा, चिनप्पा रेड्डी, समा राव, चांग पुत्तर, अमोल जाधव, मंगेश साळूंके, संपत सोनवणे, देविदास पोटे, ज्ञानेश्वर कुमावत आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com