उतरत्या वयात मिळाली बहीण; आनंदाश्रू अनावर...

उतरत्या वयात मिळाली बहीण; आनंदाश्रू अनावर...

नवीन नाशिक | वार्ताहर | New Nashik

बहिण भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन (Rakshabandhan). अनेक बहिणी आपल्या भावांना या दिवशी राखी बांधून भावा बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक व्यक्त करतात तर भाऊदेखील आपल्या बहिणीची रक्षा करण्यासाठी सदैव तत्पर असतात...

परंतु जेव्हा बहिणीनेच पाठ फिरवल्यानंतर दुसऱ्या समवयस्क बहिणीने राखी बांधल्याचा आनंद गगनात मावेनासा होतो त्याला तोड नाही. असाच अनुभव दिसून आला प्रिय दर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाऊंडेशन संचलित मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम (Manavseva Care Center Old Age Home) या संस्थेत.

समवयस्क आजी-आजोबांसाठी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य अपंगत्व वित्त सामाजिक न्याय मंत्रालयाचे माजी व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड (Ramesh Bansod) यांनी याप्रसंगी धावती भेट देऊन समवयस्क आजी-आजोबांच्या रक्षाबंधनाला प्रमुख उपस्थिती घेऊन आशीर्वाद घेतले.

80 ते 85 वयातील आजी आपल्या थरथरणाऱ्या पायावर काठीचा आधार घेत कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आल्या. रक्षाबंधनाच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या हातांनी बनसोडे यांना औक्षण करून व आपल्या वयाच्या बांधवांनाही राख्या बांधल्या. या क्षणी आश्रमातील वृद्ध माणसे गहिवरून गेली होती.

बनसोड यांनी संस्थेला याप्रसंगी दहा हजाराची देणगी दिली. सामाजिक कार्यकर्ते भाऊराव वानखेडे, रमेश घनसावंत तसेच आयोजक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष टी. एल. नवसागर, सचिव सुभाष सावंत, संचालिका ललिता नवसागर, भगवान सावंत, दत्ता सावंत, दिनेश सावंत, सुशांत नवसागर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com