वृक्षांना राख्या; पर्यावरणाचा संदेश

वृक्षांना राख्या; पर्यावरणाचा संदेश

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

रक्षाबंधनाचे (Rakshabandhan) औचित्य साधून येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (National Service Scheme) विद्यार्थ्यांनी (students) वृक्षांना राख्या बांधून (tying rakhis to the trees) अनोखे रक्षाबंधन साजरे केले.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी (students) निसर्गातीलच पाना-फुलांचा वापर करून राख्या तयार केल्या होत्या. वृक्ष आपल्याला सावली, फळे, फुले देतात. जीवनावश्यक असा ऑक्सिजन (oxygen) देतात. पर्यावरण संतुलन (Environmental balance) राखतात. मातीची झीज होऊ देत नाहीत, जीवसृष्टीला भरभरून देतात.

वृक्ष (tree) आहोत तर आपण आहोत. ते आपले संरक्षण करतात या बदल्यात आपल्याकडून त्यांना काहीही अपेक्षा नसते. वृक्षांसारखा भातृभाव प्रत्येकांनी जोपासला पाहिजे अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. दरवर्षी वृक्ष लागवड (Tree planting) करून आणि त्यांचे संवर्धन करणार असल्याची प्रतिज्ञा त्यांनी केली.

यावेळी प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे, मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा.डॉ.संजय शिंदे, उपप्राचार्य प्रा.ज्ञानोबा ढगे, प्रा.दिलीप माळोदे, प्रा.भगवान कडलग, प्रा.डॉ. सोनाली पाटील, प्रा.छाया डुकरे, प्रा.महेंद्र गायकवाड,प्रा.डॉ.छाया भोज, प्रा.सारिका गायकवाड. प्रा. सागर कडलग, प्रा.अल्ताफ देशमुख, प्रा.जयश्री गोवर्धने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ.दिलीप शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनात विविध उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण विषयक जाणीवजागृती निर्माण करणे गरजेचे आहे. वृक्ष, नदी, जंगल, पशु-पक्षी यांच्याविषयीचे कृतज्ञता भाव यांचे संस्कार हे त्यांना निश्चितच निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे असतात असे मत व्यक्त केले.

सायखेडा । भारतीय संस्कृतीत सण, उत्सव यांना अनन्यसाधारण महत्व आहे. सर्वधर्म समभाव, ऐक्य, निरपेक्ष, निस्वार्थ, आपलेपणा जपणारे सण, उत्सव साजरे करून एकनिष्ठ असल्याची जाणीव या माध्यमातून होते. रक्षाबंधन (Rakshabandhan) हा बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असणारा सण आहे. या दिवशी बहीण भावला राखी बांधून आपले रक्षण करण्यासाठी साकडे घालते. भाऊ हातातील राखीचा धागा म्हणजे बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे विचार आत्मसात करतो.

हा उत्सव सगळीकडे आनंदात साजरा होत असला तरी आपल्या सर्वांचे रक्षण करणारे महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) आपल्या कुटुंबापासून दूर असतात. शेकडो किलोमीटर अंतरावर असणार्‍या बहिणीच्या रक्षाबंधना सारख्या अनोख्या सणाला आपल्या भावाला आणि भाऊ बहिणीला मिस करत असतात. आपल्या पोलीस दादाला राखी बांधून त्यांच्या जीवनात आजच्या दिवशी असलेल्या बहिणीच्या प्रेमाची जागा भरून काढण्यासाठी जिल्हा परिषद (zilha parishad) प्राथमिक शाळा (Primary school) हाळोटी माथा येथील मुलींनी सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये (Saykheda Police Station) जावून सर्व पोलीस बांधवाना राख्या बांधल्या.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय. कादरी हे या अनोख्या रक्षाबंधन निमित्ताने चिमुकल्या मुलींनी दिलेली अनोखी भेट ही अविस्मरणीय आणि जाणीव करून देणारी असल्याचे गौरवौद्गार काढले. यावेळी सर्व पोलीस बांधव क्षणभर भावूक झाले. यावेळी मुलींनी राखी बांधून पेढा भरवला, पोलीस बांधवानी मुलींना शालेय साहित्य, केळी, बिस्कीट देऊन भविष्यात मोठे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पोलीस ढेकळे यांनी पोलीस आपल्याला कशी मदत करतात आणि पोलीस जवळ असलेले साहित्य कसे आणि कधी हताळतात हे समजावून दिले. गोदाकाठमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जावून रक्षाबंधन साजरे करणारी पहिलीच शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते. या अनोख्या रक्षाबंधनाची दिवसभर गोदाकाठमध्ये चर्चा सुरु होती. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय. कादरी, ढेकळे, गायकवाड, तेलोर, येशी, गीते, कर्डक, कहांडळ आदींसह सायखेडा पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक बाजीराव कमानकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कसबे सुकेणे। मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे विद्यालयात रक्षाबंधन सणानिमित्त एक अभिनव उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे होते. तसेच या उपक्रमासाठी प्रेरणा विद्यालयाचे उपमुख्याध्यापक शिवाजी कोटकर, पर्यवेक्षक श्रीमती. सोनवणे, संगीत शिक्षक रामेश्वर धोंगडे यांनी दिली.

रक्षाबंधन सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी इयत्ता 5 वी ते 8 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी राख्या बनविल्या. इयत्ता 5 वी ते 8 वी च्या सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना कार्यानुभव अंतर्गत या तयार केलेल्या राख्या विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना बांधल्या व एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येवून व एका अभिनव पद्धतीने हा सण साजरा केला. रक्षाबंधन कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com