
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
अखिल भारतीय मराठा महासंघ [maratha mahasangh] सर्वसाधारण सभेत महासंघाच्या सन- २०२२ ते २०२५ या तीन वर्षांपर्यंत नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. श्रीक्षेत्र पंढरपूर (pandharpur) येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते झालेल्या या सभेत राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोढरे (Rajendra Kodhare as National President) यांची निवड करण्यात आली.
विभाग उपाध्यक्षपदी नरेंद्र पाटील (अध्यक्ष अण्णासाहेब पाटील महामंडळ) सरचिटणीस प्रकाश वसंतराव देशमुख, कोषाध्यक्ष प्रमोद बळवंत जाधव तर विभाग चिटणीसपदी अतिश गायकवाड यांची निवड निर्णय अधिकारी अॅड प्रविण गोगावले यांनी वाचून दाखविली व त्यास मराठा महासंघाच्या सर्व साधारण सभेने राज्यांच्या सर्व पदाधिकारी व सभासद यांच्या सर्वानुमते अनुमोदन नुसार मंजुरी देण्यात आली .