राज्याचा ई-पीक पाहणी प्रकल्प राजस्थान सरकार राबवणार : महसूल मंत्री थोरात

मंत्री बाळासाहेब थोरात
मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर । प्रतिनिधी Sangamner

राज्यातील महसूल आणि कृषी क्षेत्रात (Revenue and agriculture sector) आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेला ई-पीक पाहणी (E-Crop Survey) हा महत्वाकांक्षी प्रकल्प राजस्थान सरकारने (Government of Rajasthan) स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.

राजस्थानचे महसूल मंत्री रामलाल जाट (Revenue Minister Ramlal Jat) यांनी महाराष्ट्राचा (maharsahtra) ई-पीक पाहणी हा प्रकल्प ई - गिरदावरी (E-Girdavari) म्हणून स्वीकारला असून हा राज्याचा पॅटर्न देशासाठी दिशादर्शक ठरत असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी दिली.

महसूल विभागाने (Revenue Department) टाटा ट्रस्टच्या (Tata Trust) मदतीने ई-पीक पाहणी प्रकल्प (E-Crop Survey Project) विकसित केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2021 पासून हा प्रकल्प राज्यभर लागू करण्यात आला आहे. हा प्रकल्प राज्यातील महसूल आणि कृषी विभागासाठी महत्वाचा बदल करणारा असून ई-पीक पाहणीमुळे शेतीचे आर्थिक नियोजन करणे सोयीचे होणार आहे.

यामुळे पिकांची आकडेवारी (Crop statistics), पिकांची उत्पादकता, शेतकर्‍यांचे आर्थिक व शेतीचे नियोजन सोपे होणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या सहकार्यातून यशस्वी झाला असून आता राजस्थान सरकारने त्यांच्या राज्यांमध्ये ई-गिरदावरी नावाने राबवण्याचे ठरविले आहे. राजस्थानप्रमाणे देशातील इतर राज्यही हा प्रकल्प लवकरच स्वीकारतील व हा अभिनव उपक्रम देशासाठी नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही राबवला जाईल असा विश्वास ना. थोरात यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी नुकतेच राजस्थानचे जमाबंदी आयुक्त महेंद्र परख, भिलवाडाचे जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते, एनआयसीचे तांत्रिक संचालक अरुण माथुर व मीना यांचे पथक महाराष्ट्र राज्याच्या अभ्यास दौर्‍यावर आले होते. या पथकाने राज्याचे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, टाटा ट्रस्टचे जयंतकुमार बांठिया व इतर सेवानिवृत्त सनदी अधिकार्‍यांसोबत मुंबईत बैठक घेवून संपूर्णऑनलाईन प्रकल्प बारकाईने समजून घेतला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com