इगतपुरी ड्रग्ज प्रकरणाचे राजस्थान कनेक्शन

ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढणार : सचिन पाटील, पोलिस अधिक्षक
इगतपुरी ड्रग्ज प्रकरणाचे राजस्थान कनेक्शन

नाशिक । Nashik

नाशिकच्या (Nashik ) इगतपुरी येथील रेव्ह पार्टीत (Igatpuri Rave Party) वापरलेले कोकेन ड्रग्जचे धागेदोरे मुंबईमार्गे राजस्थानपर्यंत (ajsthan Drugs Connections) पोहचले आहे. ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे शोधण्याचा नाशिक ग्रामिण पोलीसांचा (Nashik Rural Police) प्रयत्न असल्याचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील (Superintendent of Police Sachin Patil) यांनी स्पष्ट केले.

इगतपुरी येथील रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांनी 17 पुरूषांसह 12 तरूणींना अटक केली. त्यात पार्टीत सहभागी झालेले, ड्रग्ज पुरविणारे, बंगल्याचे केअरटेकर, बंगला मालक अशा नवीन संशयितांचा (Suspicious Arrested) त्यात भरणा होत गेला. त्यामुळे एकूण संशयितांची संख्या तीसच्या घरात पोहचली. तरूण तरूणींसह बंगल्याचे दोन केअरटेकर आणि अन्य संशयित अशा 25 जणांना तर, ड्रग्ज पुरविणे, ड्रग्ज बाळगणे या प्रकरणी चौघे सध्या ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात (Arrested By rural Police) चौकशीसाठी आहे. या सर्वांच्या पोलिस कोठडीची (Police Closet) मुदत 5 जुलैला संपणार आहे.

इगतपुरी येथील पार्टीच्या आयोजनात ड्रग्जचा वापर झाला ही गंभीर बाब आहे. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून पोलीसांनी ड्रग्ज तस्करांकडे मोर्चा (drug smugglers) वळविला आहे. नाशिक ग्रामिण पोलीसांचे एक पथक मुंबईत तळ ठोकून असून, ड्रग्ज तस्कराचे पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. ड्रग्जचे कनेक्शन राजस्थानपर्यंत पोहचले असून, तेथेही तपास सुरू असल्याचे पोलिस अधिक्षक पाटील यांनी सांगितले.

पोलिसांनी सदर बंगल्यावर कारवाई केली त्यावेळी टीव्ही सिरीयल्स, बॉलीवूड अथवा दाक्षिणात्य सिनेमांशी (South Movies) निगडीत पाच ते सहा युवतीसह इतर व्यक्तींनी ड्रग्ज घेतल्याचे व मद्यपान केल्याचे समोर आले. आरोपींच्या ताब्यातून पाच ग्रॅम कोकेन हस्तगत (Cocaine seized) करण्यात आले.

या सर्व संशयितांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी फॉरेन्सीक लॅबकडे (Forensic lab for investigation) पाठवण्यात आले. आता या अहवालाची प्रतिक्षा आहे. यामुळे पार्टीतील किती जणांनी प्रत्यक्ष ड्रग्जचा वापर केला, हे स्पष्ट होणार आहे. अंमली पदार्थाची तस्करी, सेवन आणि जवळ बाळगणे या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी हा अहवाल तितकाच महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ड्रग्जचे पाळेमुळे खोदणार

नाशिक जिल्ह्यात ड्रग्जचा वापर होणे हे पुढील पिढीसाठी धोक्याची घंटा आहे. हे रोखण्यासाठी पोलीस सर्वच पातळ्यावर कसून तपास करीत आहेत. या गुन्ह्याचे मुंबई आणि राजस्थानमध्येही कनेक्शन आढळून आले असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. ड्रग्ज पुरविणार्‍या त्या नायजेरीयन संशयितांविरोधात ठाणे पोलिसांकडे यापुर्वी गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे. या ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- सचिन पाटील, पोलिस अधिक्षक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com