
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील) (Rajaram Pangavane) यांची अखिल भारतीय काँग्रेस (All India Congress) कमिटीच्या सदस्यपदी निवड झाली. याबाबतची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पत्रकान्वये जाहीर केली.
काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) तसेच, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पानगव्हाणे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
या निवडीनंतर पानगव्हाणे म्हणाले की, सर्वांना सोबत घेऊन आपण पक्षाचे काम करणार आहोत. काँग्रेस पक्षाला याचा चांगला फायदा आगामी निवडणुकांमध्ये होईल. पक्षाला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.