नाशिकच्या बालचित्रकाराला राजा रवी वर्मा पुरस्कार

नाशिकच्या बालचित्रकाराला राजा रवी वर्मा पुरस्कार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

टिबरेवाला इंग्लिश मीडियम स्कूल, नाशिकरोड येथे इयत्ता पाचवीत शिकणार्‍या बालचित्रकार मयुरेश राजेंद्र आढाव (Mayuresh Rajendra Adhav) याला ‘राजा रवी वर्मा पुरस्कार 2022’ (Raja Ravi Varma Award 2022) प्रदान करण्यात आला....

मूर्ती लहान; परंतु कीर्ती महान असलेल्या या कुंचल्याच्या जादूगाराने एवढ्या कमी वयात चित्रकलेवर चांगलेच प्रभुत्व मिळविले आहे. त्याची चर्चा सोशल मीडियावरही (Social Media) अधिक रंगत आहे. त्याला पुरस्कार मिळाल्याने सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

चित्रकला क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना बहुमान देण्यासाठी ’राजा रवी वर्मा पुरस्कार-2022’ हा पुरस्कार अजमेर (राजस्थान) येथील कला कुटुंब फाउंडेशनकडून दरवर्षी दिला जातो. आठव्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन चित्रकला प्रदर्शन व स्पर्धेच्या माध्यमातून दिग्गज कलाकारांची निवड केली गेली.

टॉप अ‍ॅक्रेलिक पेंटिंग प्रकारात मयुरेशने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे 3 फूट बाय 3 फूट कॅनव्हासवर अ‍ॅक्रेलिक माध्यमातून साकारलेले ’द प्राइम मिनिस्टर’ हे व्यक्तिचित्र, तर अ‍ॅक्रेलिक माध्यमातूनच साकारलेले ’द मोन्क’ हे भारतीय साधूचे व्यक्तिचित्र सादर केले होते. बालचित्रकार श्रेणीतून त्याला परीक्षकांकडून परीक्षणानंतर हा पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्कारासाठी हरियाणा येथील सुप्रसिद्ध चित्रकार एस. के. राजोतिया, तर राजस्थानचे सचिन साखळकर हे परीक्षक म्हणून लाभले. या वर्षी मयुरेशने नाशिककरांना, तसेच महाराष्ट्राला साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आपल्या कलेची जाणीव करून दिली होती.

या प्रदर्शनात शरद पवार, छगन भुजबळ आणि दिलीप प्रभावळकरांना भेट म्हणून दिलेले व्यक्तिचित्रांचे आणि संमेलनात प्रदर्शित केलेल्या त्याच्या चित्रांचे भरभरून कौतुक केले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com