प्लास्टिक पिशवी बंद व्हावी म्हणून जनजागृती करणार

अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे
प्लास्टिक पिशवी बंद व्हावी म्हणून जनजागृती करणार

नाशिक । प्रतिनिधी । Nashik

महानगरपालिका अंतर्गत प्लास्टिक व्यवस्थापन व नियोजन समितीची (Plastic Management and Planning Committee) बैठक नुकतीच अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे (Additional Commissioner Suresh Khade) यांच्या अध्यक्षतेखाली झाली...

या बैठकीत ७५ मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या उत्पादन करणाऱ्या कंपनीवर कारवाई ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिसांच्या मदतीने करण्यात यावी, असे ठरविण्यात आले.

तसेच नाशिक महानगरपालिकेचे (nashik nmc) ६ विभाग असून या सहाही विभागानी आपल्या पातळीवर ज्या ठिकाणी होलसेल विक्री होत असते अशा सर्व होलसेल विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई करत रहावी अशा सूचनाही यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी दिल्या.

तर सामाजिक संस्थांच्या मदतीने प्लास्टिक पिशव्या (Plastic bags) वापरासंदर्भात पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती व प्रबोधनाचे कार्यक्रम शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येणार आहे.

तसेच मनपाच्या सर्व विभागातील मोठ मोठी आस्थापना, मॉल, दुकानदार यांच्याकडून सीएसआरच्या मदतीने कापडी पिशव्यांचे उत्पादन करून त्याचे नागरिकांमध्ये वाटप करून जनजागृती व प्रबोधन करण्यात येणार आहे. या बैठकीस सर्व विभागीय अधिकारी, समिती सदस्य आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com