त्र्यंबक तालुक्यात पावसाने फिरविली पाठ

शेतीची कामे खोळंबली
त्र्यंबक तालुक्यात पावसाने फिरविली पाठ

Nashik । नाशिक

मृग नक्षत्र सुरू होवून आठ दिवसांचा कालावधी होत आला असतांनाही तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या नाही. सुरूवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावली.

त्यानंतर पाऊस जो गायब झाला तो अद्यापही सुरू होत नसल्याने शेतीमशागतीची कामे खोळंबली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. सकाळपासून ते दुपारपर्यंत ऊन अन् दुपारनंतर ऊन-सावली असे काहीसे दृश्य तालुक्याच्या सर्वच भागात दिसून येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगांची दाठी होते; परंतू त्याच क्षणी वादळी वारे तयार होवून ढग वाहून नेले जात असल्याने पुन्हा पाऊस पडण्याची स्थिती मावळते.

दररोज पाऊस पडण्याची आशा धूसर होवून शेतीची कामे खोळंबू लागली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com