
ओझे | वार्ताहर | Oze
दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण (Cloudy weather) तयार होऊन हवामानात बदल झाल्यामुळे थंडी (cold) गायब झाली आहे. त्यातच आज सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास तालुक्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाला (Rain) सुरुवात झाल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे...
तसेच या ढगाळ व पावसाच्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये (Grape Growers) धडकी भरली आहे. प्रत्येक वर्षी अशा वातावरणमुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. या वातावरणाचा उशिरा छाटणी झालेल्या द्राक्षबागा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून अशा ढगाळ व रिमझिम पावसामुळे घडकुज, मणीगळ तसेच डावणी व भुरी रोगाचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत असतो. तर अनेक द्राक्ष बागा या रिमझिम पावसामुळे रोगग्रस्त होत असतात.
त्याचप्रमाणे या वातावरणामुळे फवारणीच्या खर्चात प्रंचड वाढ होत असते. याशिवाय यंदाच्या द्राक्ष हंगामात अनेक द्राक्षबागांना माल कमी असल्याचा फटका बसला असून औषध फवारणीवरही मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. तसेच या रिमझिम पावसामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.