त्र्यंबक परिसरात पावसाचा जोर ओसरला, भात लावणीला वेग

त्र्यंबक परिसरात पावसाचा जोर ओसरला, भात लावणीला वेग

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

त्र्यंबकसह परिसरात (Trimbak Area) तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पावसामुळे खोळंबलेल्या शेतीकामाना कमालीचा वेग (Farming Works) आला असून परिसरात भात लावणीची (Crop Sowing) कामे जोमाने सुरू झाली आहे.

पावसाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या त्र्यंबक परिसरात यंदा पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर गेल्या तीन चार दिवसापासून पावसाची जोरदार बँटिंग केली. यामुळे आता शेती कामांना वेग आला आहे. या भागात प्रामुख्याने भात (Rice), नागली, वरई आदी पावसावर अवलंबून असलेली पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यावर्षी परिसरात सुरुवातीचे वळीव पाऊस गत वर्षीपेक्षा लवकर झाले.

त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यंदा लवकर पाऊस सुरू होईल या अपेक्षेने भात, नागली, वरई आदी पिकांची पेरणी वेळेवर केली. या पिकांची रोपे साधारण 40 ते 45 दिवसात लावणीयोग्य होतात. परंतु जवळपास पंधरा ते वीस दिवस पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली होती. ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची उपलब्धता आणि वीजपंपाची सोय होती, अशा शेतकर्‍यांनी पाणी भरून भाताची आवणी करत रोपे जगविण्याचा प्रयत्न केला तर ज्यांच्याकडे सुविधा नाहीत अशा शेतकर्‍यांनी पाऊस सुरू होण्याची वाट पाहनेच पसंत केले.

उशिरा का होईना तीन दिवस पावसाने संततधार सुरु असल्याने भात, नागली, वरई या पिकांच्या आवणीची कामे पटापट उरकण्याच्या मागे सध्या शेतक रीबांधव आहे. संततधार पावसामुळे परिसरातील वळण बंधारे, नदी, नाले यांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com