कसबे सुकेणेत पावसाची जोरदार हजेरी

कसबे सुकेणेत पावसाची जोरदार हजेरी

कसबे सुकेणे। वार्ताहर Kasbe- Sukene

गेल्या पंधरवड्यापासून पावसाने दडी मारल्याने कसबे सुकेणे व परिसरातील बळीराजा चिंतेत असताना काल दुपारनंतर परिसरात जोरदार पावसाने हजेरी ( Rain )लावल्यानंतर बळीराजा सुखावला आहे.

कसबे सुकेणे व परिसरावर चालू वर्षी वरूणराजा रुसला असून संपूर्ण पावसाळ्याचा कालावधी लोटल्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. जेमतेम पावसावर कसेबसे खरिपाची पिके पूर्णत्वास येतील. मात्र रब्बी हंगाम व उन्हाळ्याच्या कालावधीत होणारी पिके यासाठी आवश्यक असलेला भूमिगत जलसाठा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध होणार नाही.

परिणामी परिसरावर दुष्काळाचे ढग घोंगावत असून काल दुपारनंतर थोड्याफार प्रमाणात जोरदार पाऊस झाला असला तरी इतक्याशा पावसाने दुष्काळाचे सावट दूर होणार नाही. आता बळीराजाला फक्त परतीच्या पावसावरच अवलंबून रहावे लागणार असून हा पाऊस कसा पडतो व त्यावर या हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे.

लवकरच द्राक्ष छाटणीच्या हंगामाला सुरुवात होत असून विहिरीत अद्यापही पुरेसे पाणी नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. एकंदरीत चालू वर्षी खरिपातील सोयाबीन, मका व चालू पिके कशीबशी येणार असली तरी पुढील रब्बी व उन्हाळी हंगाम कसबे सुकेणे परिसराच्या दृष्टिकोनातून घातकच ठरेल अशी चिन्ह दिसत आहे. त्यामुळे जोरदार पाऊस बरसणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com