नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरुवात

नाशिक जिल्ह्यात पावसाला सुरुवात
नाशिक पाऊस

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात (Nashik District) पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येक तालुक्यात पाऊस हजेरी लावत असल्याने आशादायी वातावरण तयार झाले आहे...

ग्रामीण भागात बळीराजा पावसाची सारखी वाट पाहत होता. दोन दिवसांपूर्वी इगतपुरी, पेठ सुरगाणा, नांदगाव, मालेगाव, भागात थोडा पाऊस झाला. बाकी सर्व तालुके कोरडे होते. काल रात्री नाशिकमध्ये चांगला पाऊस झाला.

आज दिवसभर ढगाळ हवामान होते. ढगाळ हवामान असल्याने आता पाऊस सक्रीय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान खात्यानेही तशी शुभवार्ता दिली आहे.

गेल्या २४ तासात इगतपुरीत सहा, नशिकला एक, दिंडोरीत १८, पेठला सहा, त्रंबकेश्‍वरला ११, नांदगावला १३, चांदवडला २९, कळवणला सात, बागलानला नऊ, सुरगाण्यात २७, देवळ्यात ९, निफाडला ७, येवल्यात ४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत २० टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी याच काळात ३५ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे अजून १५ टक्के पावसाची तुट कायम आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com