ओझे l Oze (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यात सकाळ पासून रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यामुळे द्राक्षबागायदारांचे धाबे दणाणले असून हा पाऊस कमी जास्त प्रमाणात पडल्यास द्राक्ष बागानां धोका पोहचू शकतो.

गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात थंडी गायप होऊन ढागाळ वातावरण तयार झाले होते. मात्र आज सकाळपासून अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून या पाऊसामुळे उशिरा छाटलेल्या द्राक्षबागा फ्लो-यांमध्ये असल्यामुळे या बागाना गळ,कुजीचा धोका पोहचू शकतो.

त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तर तालुक्यातील ७० टक्के द्राक्षबागाची सर्व कामे पूर्ण झाली असून मोठ्या प्रमाणात खर्चही झालेला आहे.

त्यामुळे डावणी भुरी रोगाच्या फवारणीचा खर्च वाढू शकतो. प्रत्येक वर्षी आशा अनियमित बेमासमी पावसामुळे द्राक्षबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी बागा खराब झाल्यांमुळे कर्जबाजारी होताना दिसत आहे.

दिंडोरी तालुक्यात द्राक्षबागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्यांमुळे अनेक शेतकरी द्राक्ष पिकांवर अवलंबून असतात. त्यामुळे ढगाळ वातावरण किंवा पाऊस आशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागायतदारा मध्ये धडकी भरत असते. कारण याच द्राक्षपिकांवर वार्षिक उलाढाल अवलंबून असते.