त्र्यंबक परिसरात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार

भातपिकांना दिलासा मिळणार
त्र्यंबक परिसरात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार

नाशिक | Nashik

मागील वीस दिवसापासुन गायब झालेल्या पावसाने (Rainfall) मध्यरात्रीपासून त्र्यंबक परिसरात (Trimbak Taluka) हजेरी लावली आहे. यामुळे भात पिकांना (Kharip Season) दिलासा मिळणार असुन अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना (Farmers) आहे.

तब्बल वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर ‌त्र्यंबक तालुक्यांत पावसाचे पुनरागमन झाले. शुक्रवारी दिवसभर ऊन होते, परंतु मध्यरात्री पासून पावसाने सुरवात केली आहे. परंतू पावसाची रिपरिप भात पिकाला दिलासा देणारी नसून भात शेतीला मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान गेल्या दोन दिवसापासून त्र्यंबक (Trimbak), इगतपुरी (Igatpuri), नाशिक, दिंडोरी (Condition), पेठ (Peth), सुरगाणा भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर अनेक ठिकाणी भात लावणी (Crop Sowing) कामे सुरू झाली आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com