'रामायण' बंगल्याचा परिसर जलमय

'रामायण' बंगल्याचा परिसर जलमय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आज दुपारनंतर नाशिक शहरात आलेल्या जोरदार पावसामुळे ( Rain )शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते तर महापालिका मुख्यालय शेजारी असलेल्या महापौर बंगला 'रामायण' ( NMC Mayor Bunglow 'Ramayan')देखील जलमय झाल्याचे दिसून आले.

रस्त्यावरील पाणी तसेच आत मध्ये देखील पाणी जमा झाले होते. सध्या 'रामायण' निवासस्थानावर कोणी राहत नाही, फक्त नियमित सफाई होते तर सुरक्षारक्षक तैनात आहे.

नाशिक महापालिकेत प्रशासक राजवट सुरू असल्यामुळे महापौर व इतर पदाधिकारी नाही, म्हणून शासकीय निवासस्थान रामायण बंगला सध्या रिकामा पडला आहे. नगरसचिव राजू कुटे यांच्या देखरेखी मध्ये त्याची नियमित साफसफाई होते, तसेच त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील तैनात आहे.

दरम्यान आज दुपारनंतर आलेल्या जोरदार पावसाचा तडाखा त्याला देखील बसला. मुख्य प्रवेशद्वारावर पूर्णपणे पाणी साचलेले होते तर आत मध्ये देखील पाणी साचलेले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com