नाशिककरांना सुर्यनारायणाचे दर्शन; विसर्ग घटला, पावसाचे 'टाईम प्लीज'

नाशिककरांना सुर्यनारायणाचे दर्शन; विसर्ग घटला, पावसाचे 'टाईम प्लीज'

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जवळपास आठवड्याच्या संततधार पावसानंतर आज नाशिककरांना सुर्यनारायणाने दर्शन दिले. कालपासून (दि १५) धरणातील विसर्गही घटला आहे. सकाळपासूनच वातावरण निवळलेले असून जणू पावसाने सक्तीचा 'टाईम प्लीज' म्हणून विश्रांती घेतल्याचे चित्र दिसते आहे. थोड्याफार प्रमाणात पावसाचे शिडकावे पडले असले तरी गेल्या आठवड्याभरापासून पावसात असलेल्या नाशिककरांनी आज सुटकेचा निश्वास सोडला. अनेकांनी सकाळी सकाळीच पूर पाहण्यासाठी गर्दी केलेली दिसून आली....

सद्यस्थितीत इगतपुरी तालुक्यातील दारणा धरणातून ८ हजार ८४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कडवा मधील विसर्ग कमी करून २ हजार ५८८ क्युसेकवर नेण्यात आला आहे.

दुसरीकडे, गोदावरी (Godavari River) खळाळून सोडणाऱ्या गंगापूर धरणातूनदेखील (Gangapur Dam) आता विसर्ग (water discharge) घटविण्यात आला आहे. सद्यस्थितीत गंगापूरमधून (Gangapur dam) ४ हजार १३१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच वालदेवीतून (Waldevi Dam) १८३ इतका नाममात्र पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर आळंदी धरणातून (Alandi Dam) ९६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

तिकडे होळकर पुलाखाली (Holkar Bridge) पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. सध्यस्थितीत होळकर पुलाखाली ६ हजार २९८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर तिकडे नांदूर मध्यमेश्वरमधून (Nandur Madhyameshwar) देखील जायकवाडीकडे जाणारा विसर्ग कमी झाला असून प्राप्त माहितीनुसार ४८ हजार क्युसेक असलेला विसर्ग आता कमी होऊन तो ३६ हजारांवर आलेला आहे. नाशिकमधील धरणातून पाणी कमी झाल्यानंतर पुढील विसर्गही हळूहळू कमीकमी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com