नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोर'धार'

नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोर'धार'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याभरात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज सलग दुसऱ्या दिवशी शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी आहे. अचानक आलेल्या परतीच्या पावसाने (rain) नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात बुधवारपर्यंत जोरदार पावसाची (heavy rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल नाशिक (nashik), इगतपुरी (igatpuri), सिन्नर (sinnar), वणी (Vani) परिसरात विजांंच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. सततच्या पावसाने याआधीच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, या आठवड्यात मुंबई, पुणे, ठाणे, सातारा, नाशिक, औरंगाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) हवामान विभागाने (IMD) जारी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com