Photo Gallery : नाशिक शहर परिसरात पावसाची जोरदार हजेरी

Photo Gallery : नाशिक शहर परिसरात पावसाची जोरदार हजेरी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर परीसरात गेल्या २० दिवपासुन दडी मारलेल्या पावसाने आज दुपारी साडे चारच्या सुमारास दमदार सलामीची फक्त झलक दाखवुन हुलकावणी दिली.

ग्रामीण भागात बळीराजा पावसाची चातका सारखी वाट पाहत आहे. पड रंं पाण्या पड रंं पाण्या , कर पाणी.. पाणी... शेत माझंं लई तान्हंलंं चातका वाणी| अशी साद बळीराजा वरुण राजाला घालत आहे. ७० टक्के पेरण्या खोळंंबल्याने प्रत्येक गाव पावसाच्या प्रतीक्षेत आहे. गत महीन्यात सरारीच्या २० ट्क्के पाऊस अपेक्षीत होता. मात्र तो १७ टक्कयांंच्या पुढे गेला नाही.काल इगतपुरी, पेठ सुरागाणा,भागात थोडपास झाला. बाकी तालुके कोरडचे होते.

नाशिक मध्ये आज दुपार साडे चारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.थोड्या पावसाने जलमय झालेेले रस्ते पाहुन नागरीकांना समाधान वाटले,गेल्या दोन दिवसापासुन कडक उन व दमट हवामान यामुळे घामाच्या धारा लागत होत्या. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. तरी शेतीसाठी अपेक्षित पाऊस नाशिक मध्ये अद्याप झालेला नाही.

नाशिक,त्रंबक, इगतपुरी व पेठ तालुक्यात आता पर्यंंत थोडा पाऊस झाला. मात्र आज कोकणात पावसाचे जोरदार आगमन झाल्याच्या वृत्ताने शेतक़र्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्यो. आज नसला तरी उद्या परवा नाशिकला निश्‍चीत पाऊस येईल अशी अपेक्षा आहे. हवामान खात्यानेही या आठववड्यात पावसाचा अंंदाज व्यक्त केला आहे. साधारण पणे १५ जुन पर्यंत चांंगला पाऊस झाल्यास पेरण्यांंना वेग येतो. मात्र यंदा ते धाडस कोणी केले नाही. त्यामुळे े खते, बियाने विक्रेतेही चिंंतेतच आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com