ननाशी परिसरात पावसाची संततधार

ननाशी परिसरात पावसाची संततधार

ननाशी । वार्ताहर Nanashi

ननाशीसह परिसरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ( Rain) शेतकरी ( Farmers ) वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पावसामुळे खोळंबलेल्या शेतीकामाना वेग आला असून परिसरात लावणीची कामे जोमाने सुरू झाली आहे. कालपर्यंत 387 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

तीन दिवस पावसाने संततधार सुरु असल्याने भात, नागली, वरई या पिकांच्या आवणीची कामे पटापट उरकण्याच्या मागे सध्या शेतकरीबांधव आहे. संततधार पाववसमुळे परिसरातील वळण बंधारे, नदी, नाले यांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

दरम्यान ननाशी - दिंडोरी मार्गावरील चारोसे येथील पुलावरून पाणी गेल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. संततधार पाऊस सुरू असल्याने प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहे.

ननाशी परिसर धरणांचे पाणलोट क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यंदा पावसाळाच्या सुरूवातीला जोरदार पाऊस झाल्यानंतर शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या होत्या. नंतर पाऊस गायब झाल्याने या पेरण्यांना पाण्याची निकड होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com