इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार

चोवीस तासात पावसाची विक्रमी नोंद
इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार

घोटी | प्रतिनिधी Ghoti

गेल्या महिन्याभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने इगतपुरी (Igatpuri Taluka) तालुक्यात काल मध्यरात्री पासून जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु असलेल्या संततधार पावसामुळे ग्रामीण भागात काहीसे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेल्या चोवीस तासात 95 मिमी पावसाची विक्रमी नोंद (Highest Rainfall) झाली आहे. तर दिलासादायक भात आवण्यांना वेग (Crop Sowing) आला आहे. दोन दिवसांपासून पडलेल्या दमदार पावसाने बळीराजा सुखावला आहे.

इगतपुरी तालुक्यातील अति पावसाच्या दुसऱ्या टप्यात पावसाने जोरदार मुसंडी मारली. गेल्या चोवीस तासात घाटमाथ्यावरील इगतपुरी, घोटी, भावली, मानवेढे, काळूस्ते वैतारना भागात जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेती जलमय झाली आहे. इगतपुरी तालुक्यात गेल्या चोवीस तासात विक्रमी 95 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com