रेल्वेचा एमएसटी पास बंदच

नाशिकच्या नोकरदारांना बसतोय आर्थिक फट्का
रेल्वेचा एमएसटी पास बंदचनाशिक | Nashik
पंचवटी एक्सप्रेस (Panchavti Express) सुरु झाल्याने नाशिक जिल्हयातील प्रवासी वर्गाची चिंता मिट्ली आहे. मात्र रेल्वेने एमएसटी पास (MST Pass) अद्यापही सुरु न केल्याने प्रवासी वर्गाला मोठा धक्क्क बसला आहे.

एमएसटी पास सुरु करा, अशी मागणी प्रवासी सघट्नांंकडून वारंवार केली जात आहे, पंचवटी सुरु झाल्यावर स्थानिकांंचा विचार करुन एमएसटी पास सुरु होइल अशी शक्यता प्रवासी संघट्नांना होती, ही अपेक्षा फोल ठ रली आहे.


कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून मासीक पास बंद (Monthaly Pass) करण्यात आला आहे. कोरोनाची स्थिती कमी झाल्यानंतर ट्प्याट्प्याने काही रेल्वे गाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. रेल्वे सुरु झाल्यानंतर मासीक पास देखीेल सुरु होइल अशी अपेक्षा होती, मात्र रेल्वेने जनरल तिकीट्, एमएसटी पास सुरु न करता केवळ आरक्षित तिकीटे (Reservation Ticket) सुरु करण्याचा निणय घेतला.

रोज आरक्षित तिकिट करुन प्रवास करणे नोकरदारांच्या आवाक्याबाहेर झाले आहे, प्रथम श्रेणीचा पासेससाठी पाच हजारांचा खर्च असताना तोच खर्च एकोणावीस हजारावर पोहचलो गेला आहे. पंचवटी एक्सप्रेस सुरु झाल्याने नोकरदारांची होणारी धावपळ कमी झाली आहे, याआधी नांदेड येथून सुट्णारी राज्यराणी एक्सप्रेस (Rajyarani Express) ही एकमेवच गाडी सकाळ्च्या वेळेला असल्याने मुंबइला (Mumbai City) जाणार्या नोकरदरांचे मोठे हाल होत होतेे.

मुंबई हून परतीच्या प्रवासाकरिता देखील नाशिककराना राज्यराणी याच गाडीवर अवलंबून रहावे लागायचे. पचवटी एक्सप्रेसची नाशिकरोड रेल्वे स्थानकावर (Nashikroad Railway Station) रात्रीची साडे नउ वाजेची वेळ आहे तर राज्यराणीची साडे दहा वाजेची आहे, यामुळे पंचवटी एक्सप्रेस नोकरदारांसाठी महत्वाची आहे.

पंचवटी सुरु झाल्याने होणारे हाल थांबले आहेत.मात्र एमएसटी पास बंद्च असल्याने नोकरदारांची कही खुशी कही गम अशी अवस्था झाली आहे. एमएसटी पास बंद असल्याने काहींनी कामच सोड्ले आहे, जेव्हा पास सुरु होइल तेव्हाच कामावर जाणार असल्याचे काहींचे म्हणने आहे.


मासीक पास बंद असल्याने नोकरदारवर्गाचे हाल होत आहे. पंचवटीतीलच नाही तर गोदावरी एक्सप्रेसने (godawari Express) नाशिकला येणार्‍या नोकरदाराना फट्का बसतो आहे, त्यामुळे रेल्वेचा मासिक पास सुरुकरुन खासगी नोकरदारांना दिलासा द्यावा.
- जॉन हेवाळे, प्रवासी नोकरदार, मनमाड

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com