खाजगीकरणाच्या निषेधार्थ रेल्वे कामगारांचा मोर्चा

खाजगीकरणाच्या निषेधार्थ रेल्वे कामगारांचा मोर्चा

मनमाड । प्रतिनिधी Mandad

केंद्र सरकार (Central Government) रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागाचे खाजगीकरण (Privatization) करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप करत ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन (All India SC ST Railway Employees Association) कारखाना शाखेतर्फे आज मोर्चा काढून धरणे आंदोलन (Movement) करण्यात आले.

यावेळी संतप्त कामगारांनी तीव्र निदर्शने करत केंद्र सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. कारखाना प्रबंधक मोहम्मद फैज (Factory Manager Mohammad Faiz) यांना निवेदन देण्यात येवून शासनाने रेल्वेचे खाजगीकरण (Privatization of railways) करू नये अन्यथा सर्वच रेल कामगार संघटना (Railway Workers Union) चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला.

केंद्र शासनाने अनेक रेल्वे गाड्या, रेल्वे स्टेशन (Railway station), कारखाने (Factory) खासगी उद्योगाला देण्याचा धडाका लावला असून आगामी काळात संपूर्ण रेल्वे विभागाचे खाजगीकरण केले जाईल अशी भीती रेल्वे कामगारांना वाटत असून या खाजगीकरणाच्या विरोधात रेल्वे कामगार संघटना रस्त्यावर उतरल्या आहे.आज ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन तर्फे रेल्वे वर्क शॉप (Railway Workshop) आणि इंजिनियर कार्यालय या दोन ठिकाणी मोर्चा काढून धरणे आंदोलन करून तीव्र निदर्शने करण्यात आली.

आंदोलनात रत्नदीप पगारे, शरद झोबाड, प्रदीप गायकवाड, सम्राट गरुड, अजित जगताप, रोहन उबाळे, आनंद संसारे,वसंत सोनवणे,भगवान केदारे,राहुल केदारे,पंकज कदम, प्रतिभा पगारे, सुषमा सोनवणे प्रवीण अहिरे,सचिन इंगळे, अल्ताफ खान, फकीरा सोनवणे, प्रभाकर निकम, रवींद्र पगारे, रोहित भोसले आदीसह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.