रेल्वे प्रवासी संतप्त

रेल्वे प्रवासी संतप्त

नांदगाव। प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव रेल्वेस्थानकावर कामायनी,झेलम, कुषीनगर, राजेंद्र नगर, या रेल्वे गाड्यांंचे थांबे पूर्वसूचना न देता रेल्वे प्रशासनाने रद्द केले आहेत, या गाड्या पूर्ववत होत नसल्याने रेल्वे प्रवाशांकडून संतापाचा उद्रेक झाला आहे.

करोना काळातील दोन वर्षापासून रेल्वे गाड्यांंचे थांबे पूर्ववत करण्यासाठी, तसेच नागरिकांना पादचारी पूल व्हावा. या मागणीसाठी गेल्यावर्षी याच महिन्यात नांदगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते. शहरातील सर्व नागरिकांनी,व्यापार्‍यांनी स्वयंमस्फूर्तीने बंद पाळून पाठीां दिला होता. तरी रेल्वेकडून काही उपयोग झाला नाही.

नांदगाव स्थानकावरील कामायनी,झेलम, कुषीनगर, राजेंद्र नगर, या रेल्वे गाड्यांचे थांबे रेल्वे प्रशासनाने रद्द केल्याने गैरसोय होऊन त्याबाबत तीव्र भावना व्यक्त होत आहेत. रेल्वे प्रशासनाने नांदगाव रेल्वे स्थानकाबाबत दुटप्पी भूमिका घेत शहरावर अन्याय केला. अशी भावना रेल्वे प्रवाशांची झाली आहे. रेल्वे प्रशासनाने काशी व महानगरी एक्स्प्रेस थांबे पूर्ववत करून मलमपट्टी केली आहे. महानगरी व सेवाग्राम एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांमध्ये 15 मिनिटांचे अंतर आहे.

नांदगाव तालुक्यातील नागरिक मुंबई, नाशिक,पुणे, दिल्ली या ठिकाणी जाण्यासाठी त्याचप्रमाणे सैन्य दलात असलेले तालुक्यातील जवानांना आपल्या गावी येण्यासाठी आणि कर्तव्यावर जाण्यासाठी नांदगाव येथे कोणतीही गाडी नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे गाड्या थांबा द्यावा.

दोन वर्षांपूर्वी आम्ही नांदगावकरांच्या वतीने करोना काळानंतरही नांदगाव स्टेशवर थांबणार्‍या सर्व ट्रेन चे रद्द झाले. त्याला दोन वर्षे उलटूनही खासदार तथा केद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आमच्या मागण्यांना न्याय दिलेला नाही.नांदगाव रेल्वे स्थानकावर अप- डाऊन करण्यासाठी ट्रेन उपलब्ध नसल्याने काही नांदगावकरांनी शहर सोडून बाहेरगांवी जावे लागले आहे.विध्यार्थी, व्यापारी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे .केंद्र सरकारच्या संदर्भातील अंडरपासच्या चुकीची कामाची व भ्रष्टाचाराची चौकशी करून व रेल्वेगेट जवळ रेल्वे पादचारी पूल या महत्वाच्या मागणीकडे ही दुर्लक्ष झाले आहे. रेल्वे गाड्यांचे थांबे मिळवण्यासाठी पुन्हा आंदोलने करण्याची वेळ आली आहे.

-संतोष गुप्ता, शिवसेना नांदगांव तालुकाप्रमुख ( उद्धव ठाकरे गट)

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com