कुंदेवाडी येथील रेल्वेफाटक राहणार बंद

कुंदेवाडी येथील रेल्वेफाटक राहणार बंद

निफाड । प्रतिनिधी Niphad

निफाड ते पिंपळगाव मार्गावरील ( Niphad to Pimpalgaon route ) कुंदेवाडी येथील रेल्वे क्रॉसिंगचे गेट ( railway crossing at Kundewadi )शुक्रवार दि.3 ते 7 सप्टेंबर अशा पाच दिवस बंद राहणार असल्याचे रेल्वे विभागाने ( railway department )कळविले आहे.

कुंदेवाडी येथील रेल्वे फाटक क्रमांक 99 मधील अप आणि डाऊनचे दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने सदरचे गेट हे 3 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून बंद करण्यात येणार असून हे गेट 7 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याने नागरिक व वाहन चालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन नाशिक रोड रेलपथ कार्यालयाचे सिनियर सेक्टर इंजिनिअर यांनी कळविले आहे.

याबाबत निफाड स्टेशन प्रबंधक, निफाड पोलीस स्टेशन, कुंदेवाडी बसस्थानक, कुंदेवाडी ग्रामपंचायत, आरपीएफ मनमाड तसेच स्थानिक वर्तमानपत्राच्या कार्यालयांना कळविण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com