नाशिकरोड । प्रतिनिधी

रेल्वेने 21 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 20 या कालावधीसाठी प्रवासाची आरक्षित केलेली पीआरएस काउंटर तिकिटे रद्द करण्यासाठी व आरक्षण खिडकीवरून त्याचा परतावा मिळवण्यासाठीच्या कालमर्यादेत वाढ केली आहे. रेल्वेच्या नियमित वेळापत्रकातील रेल्वेने रद्द केलेल्या गाड्यांसंदर्भातच हे लागू आहे.

वरील कालावधीसाठी आरक्षित केलेली पीआरएस काउंटर तिकिटे रद्द करण्यासाठी व आरक्षण खिडकीवरून त्याचा परतावा मिळवण्यासाठी घातलेली कालमर्यादा प्रवासाच्या दिवसांपासून सहा महिने होती. ती आता वाढवून नऊ महिन्यांपर्यंत करण्यात आली आहे.

आरक्षित तिकीट 139 मधून किंवा आयआरसीटीसी संकेतस्थळावरून रद्द केले गेले असेल तर असे तिकीट प्रवासाच्या दिनांकापासून नऊ महिन्यात आरक्षण खिडकीवर परत करता येईल.

प्रवासाच्या दिवसापासून सहा महिने उलटून गेल्यामुळे, अनेक प्रवाश्यांनी आपली मूळ तिकिटे विभागीय रेल्वेच्या दावा कार्यालयात टीडीआर किंवा साध्या अर्जासह जमा केली असतील, प्रवाश्यांना अशा पीआरएस काउंटर तिकीटांचा परतावा देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई-दिल्लीसाठी वन-वे विशेष गाडी

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते नवी दिल्लीपर्यंत एकमार्गी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 02177 एकेरी विशेष गाडी 11 जानेवारीला मुंबई येथून 23.30 वाजता सुटेल व तिसर्या दिवशी 03.30 वाजता दिल्लीला पोहोचेल. या विशेष रेल्वे गाडीला नाशिकसह मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, ग्वालियर, आग्रा कान्ट येथीही गाडी थांबे आहेत.

गाडीला व्दितीय आसन श्रेणीचे पंधरा डबे आहेत. गाडीचे बुकिंग विशेष शुल्कासह 10 जानेवारपीला सर्व पीआरएस केंद्रावर आणि ुुुwww.irctc.co.in या वेबसाइटवर करता यील. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशानांच प्रवासाची परवानगी राहील. प्रवाशांना कोविड-19 संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.