नाशिकरोड । Nashik

रेल्वेने धूम्रपान आणि ज्वलनशील सामग्रीच्या वाहतुकीविरूद्ध व्यापक मोहीम सुरू केली आहे. 31 मार्चपर्यंत जागरूकता मोहिम आणि त्यानंतर महिनाभर कायदेशीर कारवाई सुरु राहील. नाशिकरोडचा समावेश असलेल्या भुसावळ विभागमधे मोहिम सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ज्वलनशील सामग्रीच्या वाहतुकीविरूद्ध जागरूकता करण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे प्रवासी, पार्सल स्टाफ, लीज होल्डर आणि त्यांचा स्टाफ, पार्सल पोर्टर, कॅटरिंग कर्मचारी यांच्यासाठी आग प्रतिबंधक जागरुकता मोहिम राबवली जात आहे. “धूम्रपान न करणे”, रेल्वेमार्गे ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीला प्रतिबंधाबाबत संवाद, पत्रके वाटप, स्टिकर चिकटवणे, पथनाट्य, माध्यमातून जागृती आदींचा समावेश आहे.

रेल्वे गाडी आणि रेल्वे परिसरात धूम्रपानाविरोधात कठोर मोहिम राबवली जाणर आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर रेल्वे अधिनियम किंवा तंबाखू कायद्याखाली गुन्हा दाखल केला जाईल. ज्वलनशील आणि स्फोटक वस्तूंच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी नियमित तपासणी केली जाईल.

यामध्ये पैंट्रीकार (एलपीजी सिलेंडर वहन), प्रवासी डब्यांमध्ये ज्वलनशील, विस्फोटक सामग्री नेण्यांवर कारवाई केली जाईल. प्लॅटफार्म, यार्ड, वाशिंग/सिकलाइन, कोच केअर सेंटर यांची तपासणी केली जाईल. पार्सल कार्यालय, लीज होल्डर यांनी बुक केलेल्या पार्सलची नियमित तपासणी केली जाईल.