<p><strong>नाशिक रोड l Nashik road (प्रतिनिधी)</strong></p><p>दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावे, प्रस्तावित वीज बिल कायदा रद्द करावा या मागणीसाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शेतकरी कृती समिती व किसान सभेच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले.</p>.<p>गणेश उनवणे, रमेश आवटे, राजू देसले, गुलाम शेख, शशी उनवणे, तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आली. या प्रसंगी रेल्वे पोलिसांच्यावतीने रेल्वे स्थानक परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.</p>