<p><strong>नाशिक l Nashik</strong></p><p>परिमंडळ १ व २ कार्यक्षेत्रात अवैध दारू व जुगार धंद्यांवर एकूण १३ ठिकाणे छापे मारत, ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.</p>.<p>नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात चोरून, लपून चालणारे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त दीपक पांडे, नाशिक शहर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे परिमंडळ १ व परिमंडळ २ अंतर्गत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी विजय खरात, पोलीस उपायुक्त, परिमंडळ २ यांनी दिलेल्या केलेल्या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायदा व जुगार कायदा अवैद्य धंदे चालकांवर कारवाई करण्यात आली. यात एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.</p>