सटाणा शहरात जुगार अड्ड्यांवर छापे

सहा जणांना अटक
सटाणा शहरात जुगार अड्ड्यांवर छापे

मुंजवाड । Munjwad

सटाणा शहरातील (Astana city) जुने अमरधाम परिसरात (Amardham Area) सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी( Raid On Gambling) छापे मारून तीन पत्ती नावाचा जुगार पैशावर खेळतांना सहा जणांना अटक (Six Arrested) केली आहे.

शहरातील जुने अमरधाम येथे पालिकेच्या पाण्याच्या टाकी खाली व अमरधामच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेवर जुगार रंगल्याची माहिती पोलिसांना (Satana Police) मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी महेश केदू शिवदे, केदा दिनकर सरदार, राजेंद्र जगन्नाथ धिवरे, सुरेश दौलत पवार यांना ताब्यात घेण्यात आले.

दुसर्‍या कारवाईत केदा धर्मा ठाकरे, नथू लक्ष्मण आहिरे यांना ताब्यात घेण्यात आले. चौघे जण मात्र फरार झाल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या दोन्ही छाप्यात सात हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी दहा जणांविरूध्द गुन्हा दाखल (Case Filed) करण्यात आला आहे. पो.नि. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि देवेंद्र शिंदे, किरण पाटील, उपनिरीक्षक राहुल गवई यांच्या पथकाने सदर कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com