नाशकात अवैध धंद्यावर छापासत्र, २० जण ताब्यात

अखेर पोलीसांनी उगारला कारवाईचा बडगा
नाशकात अवैध धंद्यावर छापासत्र, २० जण ताब्यात

नाशिक । Nashik

अवैध व्यावसायांवर कारवाई कोणी करायची यावरून मागील पंधरा दिवसात वांदग शांत झाल्यानंतर सोमवारी विविध ठिकाणी छापे मारत अखेर शहर पोलीसांनी अवैध धंद्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

सातपुरच्या खोका मार्केट परिसरात छापा टाकून येथे पत्त्यांवर जुगार खेळताना रहिम शेख व त्याचे साथीदार अशा पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. उपनगर पोलीसांनी वडनेर गाव येथे बाबुराव पाळदे यांच्या घरात छापा टाकून कल्याण मटका खेळणार्‍या सखाराम डगळे व त्याचे दोन साथीदार अशा तीघांना अटक केली आहे.

पाथर्डी फाटा येथील बंदीस्त शेडवर इंदिरानगर पोलीसांनी छापा टाकून रमेश माने व दोन साथीदार अशी तीघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 हजार 230 रूपये जप्त करण्यात आले आहेत.

पंचवटी पोलीसांनी वाघाडी नदिचे पुलाजवळ वाल्मीकीनगर येथे एका घरावर छापा टाकून कल्याण मटका खेळणार्‍या संदिप गायकवाड व त्याचे 8 साथीदार अशा 9 जणांना अटक केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com