इंदिरानगर परिसरात हुक्का पार्लरवर धाड

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने इंदिरानगर परिसरातील एका हुक्का पार्लरवर कारवाई करत हुक्क्यासाठी वापरले जाणारे साहित्य जमा करत हॉटेल मालकावर कारवाई केली...

याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.

प्रतिकात्मक छायाचित्र
पत्नीला प्रसूतीगृहाकडे नेताना कारने घेतला अचानक पेट; दाम्पत्याचा होरपळून मृत्यू

यावरून सदर पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल द पेरू फार्म इंदिरानगर येथे अवैधरित्या हुक्का पार्लर सुरु आहे. यावरून पोलीस पथकाने हॉटेल पेरू येथे छापा टाकत हुक्का पॉट,हुक्का फ्लेवर व इतर साहित्य असा १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हॉटेल मालक शंकर राजाराम पांगरे (३०,रा. टाईम्स ब्लॉसम अपार्टमेंट चौथा मजला,पांगरे मळा बडदे नगर,नाशिक) व हॉटेलचा मेनेजर नितीन शांताराम आहिरे (२६,रा.पेरूचा बाग,इंदिरानगर) यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रतिकात्मक छायाचित्र
सिन्नर : 'त्या' खुनातील तरुणाला बेड्या; वडिलांचे अपहरण केल्याच्या संशयावरून केली होती हत्या

ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव,उपायुक्त वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी हेमंत नागरे, हवालदार गणेश भामरे,भारत डंबाळे ,बळवंत कोल्हे,नितीन भालेराव,रवींद्र दिघे,बाळासाहेब नांद्रे,अनिरुध्द येवले,भाऊसाहेब कुटे,चंद्रकांत बागडे,अविनाश फुलपगारे,दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे सहाय्यक उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे,अंमलदार विजयकुमार सूर्यवंशी,श्रीशैल सवळी,विशाल जोशी,महिला पोलीस शिपाई मनिषा मल्लाह आदींच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com