अवैध दारू अड्ड्यावर छापा

अवैध दारू अड्ड्यावर छापा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik

पोलिसांच्या अवैध धंदे पथकाने बेकायदेशीररित्या दारू विकणार्‍या एका हॉटेलवर छापा टाकला.

येथील खर्जुल मळा परिसरात एका हॉटेलवर बेकायदेशीर रित्या दारू विकणार्‍या तिघा जणांना रंगेहात पकडले आहे. सव्वा सहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या छाप्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे.

अवैध धंदे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे, पोलीस हवालदार श्रीराम शिंदे, संजय राजोळे, चंद्रकांत काळे, योगेश बिन्नर, जालिंदर चौधरी यांच्या पथकाने राजगड कॅथे हॉटेलवर छापा टाकून याठिकाणी बेकायदेशीररित्या दारू विकणार्‍या भगवान गाढवे, रा. सुभाषरोड, नाशिकरोड, धनंजय सूर्यवंशी, रा. शिंदे गाव, शरद सानप रा. चिंचोली गाव यांना रंगेहात पकडले.

त्यांच्याकडून 29 हजार 560 रुपये रोख, मोबाईल फोन, 180 मिलीच्या 168 प्रिन्स संत्रा देशी दारूच्या बाटल्या, 90 मिलीच्या टँगो पंच देशी दारूच्या 203 बाटल्या, 11 बिअरच्या बाटल्या तसेच इतर देशी व विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण सुमारे 6 लाख 11 हजार 637 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com