न्यायहक्कासाठी कुटुंबाचे उपोषण

न्यायहक्कासाठी कुटुंबाचे उपोषण

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

तालुक्यातील धोंडबार येथील Sinnar - Dhondbar एका शाळेच्या शिक्षकाचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर Death of Teacher due to corona त्यांचे थकित वेतन मिळण्यासाठी व विविध मागण्यांसाठी कुटुंबीयांकडून शाळेसमोर आमरण उपोषण hunger strike for justice infront of school सुरु केले आहे.

शिव सेवा विकास प्रसारक संस्थेच्या शिवाजी विद्यालयात Shivaji Vidyalaya of Shiv Seva Vikas Prasarak Sanstha गेल्या 20 वर्षांपासून सेवा देणारे शिक्षक कै. केशव रघुनाथ रहाटळ यांचे 9 मे ला कोरोनामुळे निधन झाले. मात्र, शाळेकडून त्यावेळी त्यांचे तीन महिन्यांचे मानधन थकवण्यात आले होते. उपचारासाठी रहाटळ यांनी मानधन मागूनही ते मिळाले नाही. नाइलाजस्तव त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे निधन झाले.

यानंतर त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. शाळेकडून त्यावेळी त्यांना वेतन अदा न करता उडवाडवीची उत्तरे देण्यात आली. संस्थेत 20 वर्ष काम करुनही संस्थेने त्यांचे पी. एफ काढलेला नसल्याने नव्हता. तसेच त्यांचे सेवा पुस्तकही शाळेकडून भरण्यात आले नाही. कमवती व्यक्तीच गेल्याने कुटूंबाचा आधारच हिरावला गेला.मात्र, यानंतरही संस्थेकडून त्यांच्या कुटुंबाला अद्यापही कुठलीही मदत मिळाली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. संस्थेच्या चुकीच्या निर्णयामुळे आज कुटुंब उघड्यावर आले असल्याचे माहिती कै. रहाटळ यांच्या पत्नी विजया रहाटळ यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे संस्थेने अनुकंपा तत्वावर कुटुंबातील सदस्याला नोकरीवर घेणे, कुटुंबाला आर्थिक मदत करणे, शासकीय नियमानूसार त्यांचा पी. एफ. अदा करावा, सेवा पुस्तक अद्ययावत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. उपोषनादरम्यान कुटुंबाला काही झाल्यास संस्था जबाबदार राहणार असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com