विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला पदभार

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला पदभार

नाशिक | Nashik

सामान्य नागरिकांचे प्रश्न विभागस्तरावर तात्काळ निकाली काढण्यासाठी विभागाचे काम नियोजनपद्धतीने करण्यावर भर देणार असून शासनाच्या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना गती देण्यात येणार असल्याची ग्वाही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.

जिल्हाधिकारी तथा प्रभारी विभागीय आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून मध्यान्हपूर्व राधाकृष्ण गमे यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी ते बोलत होते.

विभागीय आयुक्त कार्यालयातील समितीदालनात विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नवनिर्वाचित विभागीय आयुक्त श्री. गमे बोलत होते.

गमे म्हणाले, विभागाचा आढावा घेत असतांना प्रधान्याने विभागातील करोनाची स्थिती जाणून घेवून ज्या ठिकाणी पायाभुत सुविधा कमी असतील त्या ठिकाणी रुग्णांना आरोग्य विषयक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

तसेच शासनाच्या मुख्य योजनांपैकी शेतकरी पीक कर्ज वाटप व महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या महत्वाकांक्षी योजना व उपक्रमांना गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मत, विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी व्यक्त केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com