करोना रुग्णांसाठी ‘आरोग्य रचना’

रचना विद्यालय माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम
करोना रुग्णांसाठी ‘आरोग्य रचना’
करोना

नाशिक । प्रतिनिधी

व्हॉट्सअ‍ॅपच्या वेगवेगळ्या ग्रुपवर सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलणे होत होते. लोकांना किती वेगवेगळ्या प्रकारची मदत हवी आहे, याचाही अंदाज येत होता. या पार्श्वभूमीवर आपण काही करू शकतो का, अशी चर्चा सुरु झाली. ऑनलाईन मीटिंग झाली. त्या चर्चेतूनच ‘आरोग्य रचना’ हा उपक्रम आकाराला आला. या उपक्रमाचे 5 विभाग करण्यात आले आहेत. तीन विभागांचे काम सुरु झाले असून दोन विभागांचे काम येत्या काही दिवसांत सुरू होईल, अशी माहिती रचना विद्यालय माजी विद्यार्थी संस्थेचे सचिव साहेबराव हेंबाडे यांनी दिली...

Q

या उपक्रमाची रचना कशी आहे?

A

या उपक्रमाचे लसीकरण, सामाजिक बांधिलकी, अन्नदान, सेवाभाव आणि कोविड हेल्पलाईन असे 5 विभाग करण्यात आले आहेत. त्या त्या विभागाची जबाबदारी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली आहे.

Q

कोणते कार्यक्रम सुरू झाले?

A

लसीकरण, सेवाभाव आणि हेल्पलाईन हे कार्यक्रम सुरू झाले आहेत. अनेक माजी विद्यार्थ्यांचे पालक नाशिकमध्ये राहतात. त्यांची मुले नोकरी आणि व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहात आहेत. अशा पालकांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात येणार आहे. संस्थेचाच एक माजी डॉक्टर विद्यार्थी एका रुग्णालयात संचालक आहे. ते यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहेत. लसीकरण नोंदणीसाठी एक फॉर्म तयार केला आहे. सेवाभाव उपक्रमात रचना परिवारातील ज्येष्ठ नागरिक, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी व पालक, यातील जे दुर्दैवाने कोरोना बाधित झाले असतील, होम आयसोलेशन मध्ये असतील किंवा वयोमानाने बाहेर पडणे शक्य नसेल, त्यांना दैनंदिन अत्यावश्यक असणार्‍या सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हेल्पाईनही सुरु झाली आहे. सामाजिक बांधिलकी अंतर्गत वाघेरे गाव आणि आजूबाजूच्या पाड्यांमध्ये येत्या काही दिवसात औषधे, व्हिटॅमिनच्या गोळ्या, दोन मास्क आणि साबण दिले जातील. अन्नदानाचाही उपक्रम लवकरच सुरु होईल.

Q

किती कार्यकर्ते सहभागी आहेत?

A

50-60 माजी विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी आहेत. आणि सगळेच विद्यार्थी जी शक्य आहे तो मदत करणारच आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदतीसाठी सगळे सदस्य तयारच असतात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com