ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम धोक्याच्या उंबरठ्यावर

पिकांवर रोग प्रादुर्भाव
ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम धोक्याच्या उंबरठ्यावर

ओझे । वार्ताहर Oze

दिंडोरी तालुक्यात ( Dindori Taluka )गेल्या पाच - सहा दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण(Cloudy Weather ), दाट धुके तर काही रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे द्राक्षबागासह रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांसह भाजीपाला पिकांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण आहे. शेतकरी वर्गाकडून पिकांना रोगप्रतिबंधक उपाय म्हणून पिकांना विविध प्रकारच्या फवारणीसाठी खर्चात वाढ झालेली दिसून येत आहे.

खरीप हंगामात सतत पडणार्‍या पावसामुळे तसेच परतीच्या पावसामुळे व वातावरण बदलामुळे उत्पादनात चालू वर्षी मोठया प्रमाणात घट झाल्यामुळे बळीराजा हतबल असताना पुन्हा एकदा रब्बी हंगामात बळीराजा समोर अवकाळी पावसाचे नवीन संकट उभे राहिले आहे. या वातावरणामुळे द्राक्षशेती धोक्यात आली असून द्राक्षाला विविध रोगाचा सामना करावा लागत आहे.

ढगाळ वातावरण व दाट धुक्यामुळे तसेच तालुक्यात रिमझिम पडणार्‍या पावसाच्या सरीमुळे ज्या द्राक्षबागा फ्लोरा अवस्थेत आहे त्या बागेत घडकुज, मणीगळ, तसेच डावणी, भुरी, लाल कोळी, मिलीबग सारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच वातावरणात सतत गारवा असल्यामुळे द्राक्षमणी कडक होऊन द्राक्षमण्याना तडे जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकडून द्राक्षबागाच्या सुरक्षितेसाठी विविध प्रकारच्या फवारण्या घेण्याचे काम चालू आहे. द्राक्षपिक वाचविण्यासाठी खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.

तालुक्यात 20 ते 25 टक्के गहू व हरभरा र्‍यांची पेरणी पूर्ण झाली असून या वातावरणा पेरणी केलेले पिके जोमदार दिसत असून तसेच गहू, हरभरा पिकांवर गेरवा, मावा, करपा, तांबेरा व आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात अजूनही 70 टक्के पेरणी होणे बाकी आहे मात्र या वातावरणामुळे या पेरणीला शेतकरी वर्गाकडून ब्रेक देण्यात आल्याचे चित्र दिसत आहे.

वारवांर वातावरणात बदल होत असल्यामुळे शेतकर्‍यांना खर्च वाढून उत्पादनात घट होत आहे. कायमच पिकांना वाचविण्यासाठी भाडवंल उभे करायाचे कसे ? असा प्रश्न सध्या उभा राहिला आहे. खरिप व रब्बी या दोन्ही हंगामात शेतकरी वर्गापुढे अनेक संकटे उभी राहिली असून यातून सावण्यासाठी शेतकरी प्रयत्न करतानां दिसत आहे. तालुक्यात जवळ जवळ 70 टक्के शेतकरी वर्गा बॅक, सहकारी सोसायटीमध्ये थकलेला असल्यामुळे पिकांसाठी भाडवंल उभे करताना बळीराजाला मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

भात तणसाचे नुकसान

हरसूल । प्रतिनिधी

सकाळपासून बदलत्या वातावरणात अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीपिकासह जनावरांचा चारा झाकण्यासाठी शेतकर्‍यांची एकच धांदल उडाली. या पावसाने आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घाटमाथ्यातील हरसूलसह शिरसगाव, ठाणापाडा, गावठा, मुरंबी, भागओहळ, घोंगडीपाडा आदी परिसरात अवकाळी पावसाने दुपारच्या सुमारास गडगडाटासह जोरदार हजेरी लावली.शेतकर्‍यांनी सोंगणी करून ठेवलेल्या पिकासह जनावरांचा चारा (वैरण) झाकण्यासाठी एकच गर्दी केली. ऐनवेळी पडणार्‍या पावसामुळे आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.

या पावसाने आंबा उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकर्‍यांकडून वर्तवली जात आहे. अनेक ठिकाणी जनावरांचा चारा बाधित झाल्याने चार्‍याचा प्रश्न उदभण्याची शक्यता आहे.एकंदरीत या पावसामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची चिन्हे दिसून येत आहे. दोन दिवसांच्या उकाड्यानंतर गारवा निर्माण झाल्याने थंडी वाढण्याची शक्यता आहे.

कोहोरला पावसाच्या सरी

पेठ तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी उष्ण- दमट वातावरण निर्माण होवून वीजेच्या कडाक्यासह अचानक पाऊस पडला. यामुळे परीसरात नागरिकांची धांदल उडाली. कोहोर, करंजाळी परिसरात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com