मतदार याद्यांतील दुबार नावे त्वरित वगळा

मतदार याद्यांतील दुबार नावे त्वरित वगळा

शिवसेनेची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका निवडणुकिच्या (Nashik Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर दुबार मतदार धावांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिवसेनेच्यावतीने (Shiv Sena) आज याबाबत थेट मुंबईत (Mumbai) निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार (Complaint) करण्यात आली आहे.

नाशिकच्या पूर्व, पश्चिम व मध्य या तीन विधानसभा मतदार संघाच्या (Assembly constituency) मतदार याद्यांत (Voter list) घुसविण्यात आलेली 2 लाख 87 हजारांहून अधिक दुबार (बोगस) नावे त्वरित वगळण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळातर्फे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस (State Election Commission Deputy Commissioner Avinash Sanas) यांना मुंबईत भेटून निवेदन देऊन करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या असून त्यात नाशिकच्या तीन मतदार संघात इतर मतदार संघातील 287398 दुबार नावे घुसविण्यात आल्याचे सांगून निवेदनासोबत त्याचे पुरावेही आयोगाकडे देण्यात आले. शिवसेनेच्या दहा सदस्यांच्या पथकाने तीन महिन्यांत अभ्यास करून ही बोगस नावे काढण्यात आली आहे.

नाशिक पश्चिम मतदार संघात सर्वाधिक 122242, नाशिक पूर्वमध्ये 88932 तर नाशिक मध्य 76319 दुबार (बोगस) नावे घुसविण्यात आली आहेत. त्याचा फायदा घेऊन नाशकात भाजपाचे (BJP) तीन आमदार आणि 66 नगरसेवक निवडून आले. मात्र आगामी महापालिका निवडणुका पारदर्शी, निष्पक्ष आणि मोकळ्या वातावरणात व्हाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. म्हणून ही दुबार नावे या निवडणुकीच्या आत वगळण्यात यावे, असे म्हटले आहे.

दरम्यान पुरावे तपासून बघू आणि त्यात तथ्य आढळल्यास त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे अविनाश सणस यांनी शिष्टमंडळास सांगितले. शिष्टमंडळात जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी (District Liaison Officer Bhausaheb Chaudhary), जिल्हाप्रमुख विजय करंजकर (District Chief Vijay Karanjkar), महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Mayor Sudhakar Badgujar), महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (Municipal Corporation Opposition Leader Ajay Boraste) आणि गटनेते विलास शिंदे यांचा समावेश होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com