मजूर सोसायट्यांंसमोर सभासदांचा यक्ष प्रश्न

मजूर सोसायट्यांंसमोर सभासदांचा यक्ष प्रश्न
USER

नाशिक। प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील ( Nashik District ) बाराशेे मजूर सहकारी संस्थांना आपल्या संस्थेतील मजुरांंची अस्सल यादी सादर करण्याच्या सहकार खात्याच्या आदेशामुळे मजूर सोसायट्यांना ( Labor co-operative society) आता बाप दाखव, नाही श्राध्द कर! अशी वेळ आली आहे.

याबाबत माहिती अशी की, गेल्या तीस- चाळीस वर्षात अनेक राजकीय कार्यकत्ंर्यांंनी मजूर सोसायट्या स्थापन करुन त्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या निधीतून सार्वजनीक कामेे घेऊन आपल्या व्यवसायास सुरवात केली. सहकार खात्यानेही त्यांनी सादर केलेल्या मजूरं सभासदांची यादी पाहून सोसायटी मंजूर केली. बरेच वर्ष त्यांचा हा व्यवसाय अव्याहत बिनदिक्कतपणे सुरु आहे.

आता मात्र पारदर्शी कारभाराचे वारे दिल्लीपासून गल्लीपर्यंंत वाहू लागल्यानंतर राज्य शासनानेही सहकार खात्याला या मजूर सोसायटीतील मजुरांची यादी पॅनकार्ड, आधार कार्डसह सादर करण्यास सांगितली आहे. तसेच प्रत्येकाचे बॅकेत खाते उघडावे. त्यांच्या खात्यावर दरवर्षी त्यांंचा नफा जमा करावा. तसेच सोसायटीकडे जीएसटी नंंबर असावा असे नियम घातले आहेत. जेणे करुन खर्‍या मजुरांंना न्याय मिळेल. त्यांनाही त्यांचा हिस्सा मिळेल हा हेतु आहे. मात्र त्यामुळे मजुरांच्या फक्त नावावर सोसायटी स्थापन करुन स्वताच्या तुंबड्या भरणार्‍या संचालकांंची चांगलीच अडचण झाली आहे. कारण मजुर सोसायटीत मजूर कधी दिसतच नाही. अशी शंका सातत्याने घेतली जात होती. आता ती शंंकाही यानिमीत्ताने दूर होणार आहे.

गेल्या काही वर्षात संबंधींत बांधकाम अधिकारी आपल्या मर्जीतील ठेकेदार मार्फत कामे करुन मजूर सोसायट्यांंना ठरल्याप्रमाणे त्यांंचा हिस्सा देऊन कामे करत. कोणीही त्याबाबत तक्रार करत नव्हते.असा हा एकमेका सहाय्य करु. कारभार सुरु होता. आता मात्र मजुरांंची यांदी द्यायची झाल्यास साले, मेव्हणे, भाऊ, जवळचे मित्र दाखवतांना अडचणी येणार आहेत. खरे मजूर दाखवायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे.शासनाचे आदेश असल्याने सहकार खात्याचे अधिकारीसुध्दा आपल्या नियमावर ठाम आहेत. हा जाचक नियम दूर करण्यासाठी बरीच मोठी लॉबी आता कामाला लागली आहे.

मजूर सोसायटी मंंजूर केली.तेव्हा संबंधित जिल्हा उपनिबंधकांंनी सर्व पडताळणी करुनच तिला मंजुरी दिली. त्यामुळे आता पुुन्हा आमच्या काऱभारावर व ज्यांनी मंजुरी दिली त्यां अधिका़र्‍यांंच्या कामावर संंशय घेऊन वरील असे नियम का लादतात?असा प्रश्न सोसायटी संंचालक उपस्थित करत आहेत. तर शासनाच्या आदेशाचे पालन करणे आमचे कर्तव्यच आहे, अशी प्रतिक्रिया अधिकारी व्यक्त करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com