करोनाबाधित आढळल्यास होते थेट प्राथमिक शाळेत रवानगी

करोनाबाधित आढळल्यास होते थेट प्राथमिक शाळेत रवानगी

वाजगाव | वार्ताहर

देवळा तालुक्यातील वाजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतेच विलगीकरण कक्षा स्थापन करण्यात आले असून करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास थेट त्याची येथील प्राथमिक शाळेत रवानगी केली जात आहे. पंचक्रोशीतील बाधितांची रवानगी याठिकाणी होत असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात वाढत असलेली करोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे...

यापुढे वाजगाव व वडाळे गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास त्याची रवानगी येथील जिल्हा परिषद शाळेतील विलागीकर कक्षात करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत उपसरपंच दिपक देवरे यांनी दिली.

देवळा तालुक्यासह वाजगाव गावातील बाधित रुग्णाची संख्या दररोज वाढत आहे. आणि त्याच बरोबर बाधित रुग्ण गावात सर्वत्र फिरतांना दिसून येत असुन परिणामी संसर्ग वाढत आहे. शिवाय बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सर्वच सदस्य बाधित होत आहे.

यावर उपाय योजना म्हणून येथील ग्रामपंचायत तथा कोरोना दक्षता समिती व आरोग्य विभागाच्या वतीने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विलागीकरण कक्षाची स्थापना केली. जेणेकरून बाधित रुग्ण गावाबाहेर फिरणार नाही व कुटूंबातील सदस्यांना त्याचा संसर्ग होणार नाही.

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच दिपक (बापु) देवरे, मा.ग्रा.प.सदस्य विनोद देवरे, भाजप माजी तालुकाध्यक्ष सुनील देवरे, माजी सरपंच अमोल देवरे, भाऊसाहेब नांदगे, ग्रामविकास अधिकारी देवरे, समुह आरोग्य अधिकारी प्रीतम आहेर, आरोग्य सेवक प्रशांत सोनवणे, मीनाक्षी पगार, मुख्याध्यापक सुधीर आहेर, एकनाथ बच्छाव, समीर बच्छाव आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com