विकासासाठी दर्जेदार रस्ते गरजेचे

कृषिमंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन
विकासासाठी दर्जेदार रस्ते गरजेचे
कृषीमंत्री दादा भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्त्यांच्या निर्मितीवर (quality roads) भर देण्यात आला आहे. मालेगाव (malegaon) ते सटाणा (satana) या राज्य मार्गाचे काँक्रिटीकरण (concretization) राज्य (state) व केंद्र शासनाच्या (central government) निधीतून (fund) केले जात आहे. गावांचा विकास जलदगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात पक्के रस्ते असणे आवश्यक आहे.

त्यामुळे तालुक्यात जास्तीतजास्त रस्त्यांचे काँक्रीटीकरण होण्याच्या दृष्टीकोनातून लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी निधीची कमतरता आपण भासू देणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी येथे बोलतांना दिली. सटाणा ते मालेगाव (Satana to Malegaon) या राज्य मार्ग क्रं. 19 च्या कॉक्रीटीकरणासाठी राज्यशासनाच्या अर्थसंकल्पात (Budget) दोन तर केंद्र शासनाच्या सि.आर.एफ. निधीतून (C.R.F. Fund) एक अशी कामे मंजूर आहे.

या रस्त्याचा काँक्रीटीकरणाच्या कामांचा शुभारंभ कृषीमंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. उपमहापौर निलेश आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, राहूल पाटील, मनेाहर बच्छाव, सखाराम घोडके, राजेश गंगावणे, संदीप पवार आदी मान्यवर यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी गावागावात पायाभूत सुविधा असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात रस्तानिर्मीतीमध्ये काळी माती असल्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार होत नसल्याने कॉक्रीटिकरणातून रस्ता निर्मीतीचा संकल्प स्विकारण्यात आला आहे. कुसूंबा रस्ता राष्ट्रीय महामार्गात (national highways) विभाजन करून ज्या पध्दतीने त्या रस्त्याचे कामकाज झाले आहे, त्याच प्रमाणे मालेगाव ते सटाणा रस्त्याचे कामकाज होवून भविष्यात चांगली सुविधा शेतकरी बांधवांना या माध्यमातून निर्माण होईल असा विश्वासही भुसे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

ग्रामस्थांच्या आरोग्याच्या समस्या (health issue) सोडविण्यासाठी तालुक्यात पाच रुग्णालये उभारण्यासाठी आरोग्य मंत्र्यांशी (Minister of Health) चर्चा करुन लवकरच या रुग्णालयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात येईल, अशी माहिती देत कृषिमंत्री भुसे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील रस्ते विकासासोबतच पाणी पुरवठ्याच्या योजनेतही गाव स्वावलंबी झाले पाहिजे. त्यासाठी योग्य नियोजन व आराखडा तयार करुन शासनाच्या योजना गावा-गावात राबविण्यात याव्यात.

त्यासाठी शासन सर्वोतोपरीने प्रयत्नशील आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीने गावात वृक्षारोपण (tree plantation) करुन मोठ्या प्रमाणात गावे हरित करण्याचा संकल्प करावा. वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा आर्दश येणार्‍या पिढीसमोर ठेवावा. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचा वापर करावा, असे आवाहन ना. भुसे यांनी शेवटी बोलतांना केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com