नाशिक | Nashik

शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची योजना समाजकल्याण विभागाने आखली आहे.

एक प्रसिद्ध ट्रस्ट व संघटनेच्या मदतीने समाजकल्याण विभागाच्या शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.समाजकल्याण विभागाकडून अनुसूचित जातीकरिता विविध योजना राबविल्या जातात. शैक्षणिकसोबत आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न असतो.

विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याच प्रमाणे विदेशात शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना सहकार्य असते. उच्च शिक्षणासोबत आता प्राथमिक शिक्षणाही अधिक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार देण्यावर भर दिला आहे.

या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व मराठी विषयात अधिक पारंगत करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. समाजकल्याण विभागाने यासाठी टाटा ट्रस्टशी करार केला. शिक्षण कशाप्रकारे द्यावे, कोणती काळजी घ्यावी याबाबतचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे.

हे सर्व प्रशिक्षण ऑनलाईनरीत्या देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षणही देणे चांगेल आहे. त्याकरिता समाजकल्याण विभागाकडून नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजकल्याण विभागाच्या ९० शाळा असून, येथे जवळपास १३ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तर २५०० वर आश्रम शाळा असल्याचे सांगण्यात येते.

टाटा ट्रस्ट उचलणार भार

पहिल्या टप्प्यात ९० शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षणांना प्रशिक्षण देण्याचे काम पूर्ण होईल. विद्यार्थ्यांच्या पुस्तकासाठी काही खर्च येणार असून टाटा ट्रस्ट हा भार उचलणार आहे.